ऑस्कर विजेत्या ‘एलिफंट व्हिस्परर्स’मधील जोडप्याची निर्मात्यांना नोटीस

 ऑस्कर विजेत्या ‘एलिफंट व्हिस्परर्स’मधील जोडप्याची निर्मात्यांना नोटीस

चेन्नई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या ऑस्कर विजेत्या लघुपटामुळे जगप्रसिद्ध झालेल्या बोमन आणि बेली या जोडप्याने आता या माहितीपटाच्या दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांना कायदेशीर नोटीस पाठवून २ कोटी रुपयांची मागणी केली आहे. या माहितीपटात या जोडप्याचे हत्तींसोबतचे अनोखे नाते आणि त्यांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न दाखवले होते. आता या जोडप्याचा आरोप आहे की माहितीपटाच्या दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांनी माहितीपट बनवताना त्यांना आर्थिक मदत आणि बेलीच्या नातवाच्या शिक्षणासाठी मदतीचे आश्वासन दिले होते.मात्र ते पूर्ण केलेले नाही.

मात्र दिग्दर्शकांनी एक निवेदन जारी करत, त्यांनी जे वचन दिले होते ते पूर्ण केले आहे. आता त्या आणखी पैसे देणार नाही.असे स्पष्ट केले आहे.

कायदेशीर नोटिसीद्वारे, बोमन आणि बेली यांनी दावा केला आहे की निर्मात्यांनी त्यांना घर, एक वाहन आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते.निर्मात्यांनी सांगितले होते की, माहितीपटातून जो काही नफा होईल, त्यातील काही भाग ते या जोडप्याला देतील.नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की या जोडप्याला या प्रकल्पाचे ‘रिअल हिरो’ म्हणून प्रसिद्ध सेलिब्रिटी, क्रीडा व्यक्तिमत्व आणि राजकारणी यांच्याशी ओळख करून दिली जाईल. यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यांच्या कामाची ओळख होण्यासही मदत झाली.मात्र या दाम्पत्याला त्यांच्या कामाचा कोणताही आर्थिक मोबदला मिळाला नाही. दुसरीकडे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान यांच्याकडून मिळालेले आर्थिक लाभही निर्मात्यांनी आपल्या वाट्याला ठेवले.

या प्रकरणात, बोमन आणि बेली यांना चेन्नईस्थित वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राज यांची मदत घेतली आहे.

SL/KA/SL

7 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *