अमित शहा यांच्या पुणे भेटीत नेमके काय झाले…

पुणे दि ६– केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे गेले दोन दिवस पुणे दौऱ्यावर आले होते, त्यांच्या या दौऱ्यात राज्यातील सत्तारूढ पक्षाचे तिन्ही मोठे नेते उपस्थित होते. या चौघात नेमकी काय चर्चा झाली आणि त्यातून आणखी काही धक्कादायक बातमी मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.अमित शहा हे काल दुपारनंतर पुण्यात दाखल झाले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेच त्यांच्यासोबत होते ,तसे चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील ही होते मात्र देवेंद्र फडणवीस नसताना फार मोठी चर्चा अपेक्षित नव्हती.फडणवीस काल मध्यरात्री पुण्यात दाखल झाले, त्यापूर्वी उपराष्ट्रपती भेट आणि नागपुरातील इतर नियोजित कार्यक्रमात ते व्यस्त होते. मध्यरात्री पुण्यात दाखल होताच ते शाह यांच्या भेटीला गेले , तिथे मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा यांच्यासह पहाटे पर्यंत बरीच खलबते झाली आहेत. यात राज्य मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तारही करण्याची चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.यासोबतच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील एक मोठा नेता अजितदादा गटात सामील होऊन त्याला या विस्तारात सामावून घेतले जाण्याची चर्चा आहे. दुसरीकडे आपण शाह यांना पुण्यात भेटलोच नाही असा खुलासा जयंत पाटील यांनी केला असून आपण शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे म्हटले आहे.गेल्या महिन्यात झालेल्या धक्का तंत्रानुसार काँग्रेसमधील नाराज आणि मूळ राष्ट्रवादी मधील काही जण सत्तेत सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस मध्ये आणि मंत्रिपदासाठी मूळ राष्ट्रवादीत काही नाराजी निश्चितच आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होणार असल्याची चिन्हे असून त्यादृष्टीने शाह यांच्या या दौऱ्यात काही हालचाली झाल्या का ते शोधणे आवश्यक झाले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *