हे आहे मद्यविक्रीत देशातील आघाडीचे राज्य

 हे आहे मद्यविक्रीत देशातील आघाडीचे राज्य

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मद्यपान हे शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी कितीही घातक असले तरीही याच्या विक्रीतून देशाला बक्कळ महसूल मिळतो. त्यामुळे कोणतेही सरकार मद्यविक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यास धजावत नाही. देशात दरवर्षी अब्जावधी लिटर दारु रिचवली जाते.देशातील जवळपास सर्वच राज्यात दारुची विक्री होते. दिल्ली, गोवा, पंजाबसह अनेक राज्य सरकारला मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळतो. मद्यावर सर्वाधिक उत्पादन शुल्क मिळते. त्यामुळे राज्य सरकारला मोठी कमाई होते. एकीकडे सरकार दारुबंदीसाठी अभियान राबविते. पण त्याच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत मद्यविक्रीवरील कर असतो. पुरुष सर्वाधिक दारु पितात. तर दारु सेवन करण्यात महिलांची संख्या कमी आहे.

अरुणाचल प्रदेश हे देशातील मद्य विक्रीत सर्वात आघाडीवर आहे. या राज्यातील 53% हून अधिक लोक दारु सेवन करतात. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगाणा राज्य आहे. या राज्यात 43% अधिक लोक मद्यप्रेमी आहेत.अरुणाचल प्रदेशात 15 वर्षांवरील 24% महिला दारु पितात.

आरोग्य आणि कुटुंब कल्याणच्या एका सर्व्हेनुसार, 15 ते 40 वयोगटातील लोक सर्वात जास्त दारुचे सेवन करतात. यामध्ये तेलंगाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्याचा सर्वाधिक क्रमांक लागतो. ब्रह्मपुत्र क्षेत्र, झारखंड, छोटा नागपूर याभागातील लोक दारु पितात. छत्तीसगडमधील बस्तर, ओडिशा ही राज्य यामध्ये सहभागी आहेत. तर 30 ते 40 टक्के दारु पिणारे उत्‍तराखंड, मणिपुर, मेघलय, त्रिपुरा आणि ओडिशा या राज्यातील मोठा भाग सहभागी आहे. तर दिल्ली, पंजाब, युपी, गुजरात, राजस्थान आणि गोवा या भागातील लोकांचे दारु पिण्याचे प्रमाण केवळ 20 टक्के आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पहायचे झाल्यास सेशल्स हा आफ्रिकन देश मद्यपानात आघाडीवर आहे.याला मद्यराष्ट्र म्हणून ओळखले जाते. कारण या देशात वार्षिक प्रति व्यक्ती 20.5 लिटर मद्यपान करतो.

SL/KA/SL

ML/KA/SL

29 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *