गुलाबजाम २ चित्रपटाची घोषणा

 गुलाबजाम २ चित्रपटाची घोषणा

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : मराठी खाद्य संस्कृतीची रंगतदार ओळख करून देणारा ‘गुलाबजाम’हा सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भुमिका असलेला चित्रपट रसिकांना खूप आवडला होता. या चित्रपटाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकरच्या बहुप्रतिक्षित गुलाबजाम 2 ची घोषणा केली आहे. मात्र या चित्रपटात सोनाली सोबत सिद्धार्थ ऐवजी वैभव तत्ववादी भूमिका करणार आहे.2018 मध्ये रिलीज झालेला गुलाबजाम या चित्रपटाने संपूर्ण भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केली.

वैभव गुलाबजाम 2 साठी कसुन मेहनत घेत आहे.“देव खरोखरच दयाळू आहे आणि अशा नेत्रदीपक प्रकल्पांचा भाग असल्याची घोषणा करताना खूप आनंद वाटतो! सचिन कुंडलकर सोबत काम करणे हा नेहमीच एक चांगला अनुभव राहीलाय माझ्यासाठी.सोनालीसोबतचा हा माझा पहिला चित्रपट असेल आणि गुलाबजाम 2 सोबत आम्ही कशाप्रकारे जादू निर्माण करतो याची मी खरोखरच वाट पाहत आहे. सचिनची अपवादात्मक दिग्दर्शनाची दृष्टी, फ्रेमिंगची जन्मजात समज आणि उल्लेखनीय लेखन कौशल्याने त्याला चित्रपटसृष्टीत त्याच्या काळाच्या पुढे स्थान दिले आहे. ” असे वैभव तत्तवादीने सोशल मिडियावर म्हटले आहे.

वैभव काही महिन्यांपुर्वी निर्मल पाठक की घर वापसी या कौटुंबिक वेबसिरीजमधील दिसला होता. वैभव तत्ववादीने अलीकडेच बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर कमांडोचा भाग असल्याची घोषणा केली. आता गुलाबजाम 2 मध्ये वैभवची सोनालीसोबतची भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.

SL/KA/SL

29 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *