महापालिकांची आर्थिक स्थिती तपासूनच मालमत्ता कर माफी

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत त्या-त्या महापालिकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं, ते याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देत होते.
मुुंबई महापिलकेेचा कायदा वेगळा आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय इतर महापालिकेत घेता येऊ शकत नाही. मात्र मात्र मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले आहे. तिथे हे धोरण यशस्वी झाले तर इतर महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघून त्याची अंमलबजावणी करता येईल का याचा अभ्यास केला जाईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं.
पुणे महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी करणारी लक्षवेधी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मांडली होती.
पिंपरी-चिंचवड मधील दंड वसुलीस स्थगिती
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रति मालमत्ता 60 रुपये प्रतिमहा उपयोगकर्ता शुल्क व दंड वसुली सुरू असून हे बेकायदेशीर असल्याचा प्रश्न महेश लांडगे यांनी लक्ष वेधी मांडली होती. याबाबत त्या वसुलीस मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
ML/KA/SL
21 July 2023