आजकाल सरकार खोक्यातून जन्माला येते

अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आताचे राजकीय चित्र फार बदलत असून पूर्वी सरकार हे मतपेटीतून जन्माला येत होते आता खोक्यातून जन्माला येते अशी खंत शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौर्यावर असून आज अमरावती येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी आले असता त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.Nowadays government is born out of a box
भाजप सरकार विरोधात येणार्यांना विरोधक म्हणणे योग्य नाही तर हे सर्वच लोकशाही व देशप्रेमी आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली असे असतांना स्वातंत्र्याचा ऱ्हास होणार नाही यासाठी देश भरातील देशप्रेमी एकत्र येत आहेत असे सांगून सर्व सामान्य नागरिकांनी सुद्धा यात सहभागी व्हावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाची आम्ही वाट बघत आहो. घाईगडबडीत कोणी प्रस्ताव देऊ नये यासाठी काही काळ लागेल हे स्वाभाविक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी कोणताही अल्टिमेटम् दिलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
ML/KA/PGB
10 July 2023