टोमॅटोच्या सुरक्षेसाठी भाजीवाल्याने केली बाऊन्सर्सची नेमणूक

लखनऊ,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही दिवसांपासून देशभर टोमॅटोच्या दराने शंभरी पार केल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणेच भाजी विक्रेते अधिक कमाई करत आहेत. वाराणसीत एका भाजी विक्रेत्याने स्टंटबाजी करत टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर तैनात केले होते. या प्रकरणी दुकान मालक आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस भाजी विकणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला शोधत आहेत. अजय फौजी असं त्याचं नाव आहे. लंका पोलीस ठाण्यात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाराणसी पोलिसांनी तीन ज्ञात आणि एका अज्ञाताविरोधात लंका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. नगवा परिसरात रविवारी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यानं भाजी विक्रेता बनून एक अनोखं आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केला होता.
या भाजीवाल्याची सुटका लगेगच व्हायला हवी, असं यादव याआधी म्हणाले होते. ‘वाराणसीत महागाईसारख्या जनहिताच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधू पाहणाऱ्या भाजीवाल्याला पोलीस ठाण्यात बसवणं किती योग्य आहे? ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर राज्यातील सर्वच भाजीवाले आक्रोश व्यक्त करत आहेत. त्या भाजीवाल्याला लगेचच सोडायला हवं,’ अशी मागणी त्यांनी केली.
SL/KA/SL
10 July 2023