हा क्रिकेटपटू करतोय राजकारणात प्रवेश

अमरावती, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर खेळाडू कोणत्या क्षेत्रात कामगिरी करतात याकडे त्यांच्या फॅन्सचे लक्ष असते. बरेचदा खेळाडू क्रिकेटशी निगडीत विषयातच काम करत असतात. पण आयपीएल २०२३ नंतर निवृत्त झालेला भारताचा ऑलराऊंडर खेळाडू अंबाती रायडूने राजकारणात करिअर घडवण्याचे ठरवले आहे. नुकतीच त्याने आपल्या या दुसऱ्या इनिंगची घोषणा केली.
अंबाती रायुडूने आंध्र प्रदेशमधील स्थानिक माध्यमांना तो लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात उडी घेणार असल्याचे सांगितले. ३७ वर्षीय रायुडू म्हणाला की, ‘मी आंध्र प्रदेशच्या राजकाणात लवकरच प्रवेश करणार आहे. मात्र त्यापूर्वी मी जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देणार आहे. मला लोकांची भावना आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत.’ मुळच्या गुंटूरच्या असलेल्या रायुडूने मुतलुरू गावातील वाट्टीचेरूकुरू या ब्लॉकला भेट दिली. यावेळीच त्याने हे वक्तव्य केले.
रायुडू म्हणला की गुंटूरमधील ग्रामीण भागातील लोकांची माहिती घेण्यासाठी, त्यांच्यासाठी काय करता येईल यासाठी मी हा दौरा करत आहे. रायुडू म्हणाला की मी राजकारणात एक सक्षम अॅक्शन प्लॅन घेऊन येणार आहे. यासाठी कोणतं माध्यम निवडायचं हे देखील ठरवणार आहे. अंबाती रायुडू गुंटूरमधून 2024 च्या लोकसभा निवडणूक लढवण्याची चाचपणी करतोय अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र अंबाती रायुडूने या शक्यता फेटाळल्या आहेत.
SL/KA/SL
30 June 2023