केसीआर पूर्ण मंत्रिमंडळासह घेणार विठ्ठल दर्शन
सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापूर शहरांमध्ये आगमन झालं आहे. सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम असून उद्या त्यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.
चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय. केसीआर
मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना विठ्ठल-रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन देण्यास हिंदुराष्ट्र सेनेने विरोध केला आहे. सोलापुरातील हिंदुराष्ट्र सेनेचे तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. वारकरी 25-30 दिवस चालत येऊन रांगेतून दर्शन घेत असताना केसीआर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन का, असा सवाल हिंदुराष्ट्र सेनेने केला आहे.
SL/KA/SL
26 June 2023