आर्थिक सुधारणा आणि धोरणातील हस्तक्षेपामुळे बँकांची कर्ज क्षमता दहा टक्क्यांनी वाढेल – क्रिसिल

 आर्थिक सुधारणा आणि धोरणातील हस्तक्षेपामुळे बँकांची कर्ज क्षमता दहा टक्क्यांनी वाढेल – क्रिसिल

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक सुधारणा (Economic reforms) आणि धोरणात्मक हस्तक्षेपामुळे (Strategic intervention) बँकांची कर्ज देण्याची क्षमता 2021-22 दरम्यान दुप्पट होऊन ती 10 टक्क्यांवर जाईल. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस अनुत्पादक मालमत्ता (NPA) 10.5 ते 11 टक्क्यांच्या पातळीवर जातील जे सुरुवातीच्या अंदाजापेक्षा कमी आहे.
पतमानांकन संस्था क्रिसिलने (CRISIL) आपल्या अहवालात म्हटले आहे की 2021-22 मध्ये बँकांची कर्ज क्षमता 4 ते 5 टक्क्यांनी वाढून 9-10 टक्क्यांवर जाईल. यात किरकोळ कर्जाचा वाटा जास्त असेल, तर कॉर्पोरेट कर्जातही 5 ते 6 टक्क्यांची वाढ दिसून येईल. अर्थव्यवस्थेविषयी (Indian Economy) संस्थेने म्हटले आहे की 2020-21 मध्ये 7.7 टक्क्यांची घट झाल्यानंतर जीडीपी (GDP) 2021-22 दरम्यान 11 टक्के दराने वाढेल. परंतू सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमुळे आर्थिक सुधारणांना धक्का बसू शकतो.

आपत्कालीन कर्ज हमी योजना उपयुक्त
Emergency loan guarantee scheme suitable

या अहवालात म्हटले आहे की सन 2020-21 दरम्यान बँकांची आपत्कालीन कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यात कर्ज हमी योजनेची ( loan guarantee scheme) महत्त्वाची भुमिका होती. या कालावधीत दुसर्‍या सहामाहीमध्ये कर्ज देण्याच्या क्षमतेत व्ही-आकाराची सुधारणा दिसून आली. त्याचवेळी एनबीएफसीच्या (NBFC) संदर्भात म्हटले आहे की रिअल इस्टेट सारख्या क्षेत्राला जोखमीची कर्ज दिल्यामुळे मार्च 2021 पर्यंत बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे (एनबीएफसी) अडकलेले कर्ज वाढून 1.8 लाख कोटींवर गेले.
Due to economic reforms and strategic intervention, the lending capacity of banks will double to 10 per cent by 2021-22. At the end of the current financial year, non-performing assets (NPAs) will go up to 10.5 to 11 per cent, which is lower than the initial estimate.
PL/KA/PL/2 APR 2021

mmc

Related post