या दिवशी मुस्लीम बांधव साजरी करणार नाहीत बकरी ईद

 या दिवशी मुस्लीम बांधव साजरी करणार नाहीत बकरी ईद

छ.संभाजीनगर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदूंचे काही मुख्य सण आणि मुस्लीम बांधवांचा ईद सण बरेचदा एकाच दिवशी येतो हा योगायोग आहे. यावर्षी देखील आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी म्हणजे २९ जून रोजी आहेत. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. एकादशी आणि ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंढरपूर येथील नागरिकांनी बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बकरीची कुर्बानी देतात, तर आषाढी वारीला वारकऱ्यांचा उपवास असतो. त्यामुळे हिंदू बांधवांचा अवमान होऊ नये. यासाठी औरंगाबादमधील पंढरपूर येथील गावकऱ्यांनी बकरी ईद आषाढी वारीच्या दिवशी साजरी करण्याऐवजी दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर यांनी सांगितले की,” गावातील सर्व मौलाना आणि जुम्मेदार लोकांनी बकरी ईदची कुर्बानी ३० जून रोजी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाईल असा निर्णय घेतला आहे. आमच्या गावात आषाढी वारीला १२ ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मुस्लीम समुदायाला विनंती करतो की, बंधुभावाचा संदेश सर्वत्र पोहोचवा आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करा. बकरी ईद साजरी करण्यासाठी आपल्याला तीन दिवसांचा अवधी आहे.”

SL/KA/SL

22 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *