मनाचे आणि शरीराचे विकार दूर करण्यासाठी योगा आवश्यक

 मनाचे आणि शरीराचे विकार दूर करण्यासाठी योगा आवश्यक

मुंबई दि.19( एम एमसी न्यूज नेटवर्क) : माणसाच्या मनात निर्माण होणारा अहंकार आणि क्रोध यामुळे खुप नुकसान होते.अहंकार आणि क्रोधासारखे मनाचे विनाशकारी विकार नियंत्रीत ठेवण्यासाठी योग करणे, मेडिटेशन करणे आवश्यक आहे. मनाचे आणि शरिराचे वाईट विकार नियमित योग केल्यामुळे दूर होतात असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

रामदास आठवले सद्या दुबई दौ-यावर आहेत. दुबईमधील मेत्ता योगा सेंटर येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दुबईतील भारतीयांच्या वतीने रामदास आठवले यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

मेत्ता योगा सेंटरच्या संचालिका श्रीमती रेखा अगरवाल, नविन कुमार, डॉ. साहित्य चतुर्वेदी, डॉ. तौफिक पाशा, विजय शिवदासाने, निता नारायण, जया मेहतानी, लता अवतानी आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

SW/KA/SL

19 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *