आषाढीसाठी एसटीकडून 5 हजार बसगाड्यांचे नियोजन

 आषाढीसाठी एसटीकडून 5 हजार बसगाड्यांचे नियोजन

सोलापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून विविध आगारातून 5 हजार बसेस नियोजन करण्यात आले आहे. यात सोलापूर विभागातील नऊ डेपोतून 250 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे.Planning of 5 thousand buses from ST for Ashadhi

एकादशीसाठी पंढरपूरला जाणार्‍या भाविकांसाठी 25 जूनपासून रोज ज्यादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. 3 जुलैपर्यंत ही वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी दिली.

महाराष्ट्रसह इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात. यंदा देखील आषाढीवारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून जाणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

२५ जूनपासून बसस्थानकांतून जादा गाड्या सोडल्या जात आहेत. शहरातील मुख्य बसस्थानकांतून जादा वाहतुकीची व्यवस्था केली आहे.

या शहरातून सोडण्यात येणार ज्यादा बसेस

1)औरंगाबाद–1250
2)मुंबई–540
3)नागपूर–110
4)पुणे–1250
5)नाशिक–1100

6)अमरावती–750

याठिकाणी असतील थांबे…

1)चंद्रभागा बस स्थानक-पुणे,पंढरपुर,ठाणे,पालघर,रायगड,मुंबई,सांगली,रत्नागिरी,सातारा.

2)भिमा बस स्थानक–सोलापूर,औरंगाबाद,बीड,जालना,लातूर,नांदेड,उस्मानाबाद,परभणी,भंडारा,चंद्रपूर,,नागपूर,वर्धा,अमरावती,अकोला,बुलढाणा,यवतमाळ.

3)विठ्ठल बस स्थानक–
करमाळा,अहमदनगर,धुळे,जळगाव,नाशिक,

4)पांडुरंग बस स्थानक–
सांगोला,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर

ML/KA/PGB
9 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *