ताडोबालगत असलेल्या कोळसा खाण विस्ताराला विरोध

 ताडोबालगत असलेल्या कोळसा खाण विस्ताराला विरोध

चंद्रपूर दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूरचे संपन्न वनवैभव म्हणजे जागतिक ख्याती असलेला ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प. याच प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात चंद्रपूर शहराला अगदी लागून असलेल्या सिनाळा गावाच्या शिवारात दुर्गापुर वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प होऊ घातला आहे.

याच कोळसा खाणीला विरोध करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनी चंद्रपूरचे पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते एकवटले होते. ही कोळसा खाण रद्द करा . ताडोबा जंगल आणि इथले वाघ वाचवा यासाठी निसर्गरम्य परिसरात आंदोलन करण्यात आले. ही खुली कोळसा खाण 121.58 हेक्टर जागेवर होणार असून यासाठी केंद्र सरकारने वन जमीन देऊ केली आहे.
याबाबत वने व वन्यजीव संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून या भागात सुमारे आठ वाघांचा वावर आहे.

याशिवाय शेकडो वन्यजीव देखील या क्षेत्रात असून गेली काही वर्षे या भागात मानव -वन्यजीव संघर्षात अनेक बळी गेले आहेत. अगदी थोड्या कोळशासाठी चंद्रपूर शहराच्या लगत असलेले संपन्न वनवैभव नष्ट करण्याचा घाट सरकारने घातला असून त्यासाठी हजारो झाडे व जमीन यांची नासधूस होणार आहे. जगात सर्वाधिक वृक्षारोपण करण्यासाठी पुरस्कृत होणारा हा जिल्हा- वाघांचा जिल्हा आता भकास होत चालला असून इथली शुद्ध हवा कायम ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे खाण प्रकल्प तातडीने गुंडाळावे यासाठी पर्यावरणवाद्यांनी जोरदार पाऊल उचलले आहे.

ML/KA/SL

5 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *