ठाकरेंच्या विरोध मोर्चाला समर्थनाच्या मोर्चाने उत्तर

 ठाकरेंच्या विरोध मोर्चाला  समर्थनाच्या मोर्चाने उत्तर

सिंधुदुर्ग दि ३० – उद्धव ठाकरे यांनी बारसू मध्ये विरोधाचा मोर्चा काढला तर आम्ही समर्थनाच्या मोर्चाने त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे . नारायण राणे यांनी कणकवली येथे माध्यमांशी संवाद साधताना हा इशारा दिला . प्रत्येक प्रकल्पाला यांचा विरोध असतो , यापुढे जो कोणी कोणत्याही प्रकल्पाला विरोध करेल त्याला मी सामोरे जाईन असं नारायण राणे पुढे म्हणाले . कोकणातील बेरोजगारी दूर होऊन आर्थिक संपन्नता बारसू प्रकल्पाच्या माध्यमातून येणार आहे असे त्यांनी पुढे सांगितले .

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *