हे आहेत ६८ व्या फिल्मफेअर पुरस्काराचे विजेते

 हे आहेत ६८ व्या फिल्मफेअर पुरस्काराचे विजेते

मुंबई,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्काराचे ६८ वे वर्ष होते. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काल सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.

या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा गाजलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर याच चित्रपटासाठी आलियाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या मान मिळवला.

संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने तब्बल 10 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले, तर हर्षवर्धन कुलकर्णींच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड श्रेणीत सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-1 शिवा’ या चित्रपटालाही चार श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी शीतल शर्माला, बेस्ट प्रोडक्शन डिझाइनसाठी सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे यांना पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील ‘ढोलिडा’ गाण्यासाठी कृती महेशला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. सुदीप चॅटर्जी यांना याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला.

हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आज (28 एप्रिलला) कलर्स वाहिनीवर रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.

काही महत्त्वाचे पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जियो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट संवाद : प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट पटकथा : अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंह (‘ब्रह्मास्त्र’मधील ‘केसरिया’ गाणे)
सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : भूमी पेडणेकर (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : तब्बू (भूलभुलैय्या 2)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) : हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) : संजय मिश्रा (वध)
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 : प्रेम चोप्रा
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- प्रीतम ( ब्रह्मास्त्र )
सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष – अंकुश गेडाम (झुंड)
सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री – एंड्रिया केविचुसा (अनेक)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक – जसपाल सिंह संधू आणि राजीव बरनवाल (वध)
सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (ब्रह्मास्त्र – केसरिया गाणे)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कविता सेठ (जुग जुग जिओ – रंगीसारी गाणे)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – सुदीप चॅटर्जी (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन – परवेज शेख (विक्रम वेधा)

SL/KA/SL

28 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *