ईट राईट मिलेट मेळावा आणि वॉकथॉन

ठाणे , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगभरात साजरे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या अनुषंगाने भारतीय अन्न संरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारा (FSSAI) ठाणे महानगरपालिका, न्यूट्रिलाइट व Assocham यांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी मैदान, ठाणे येथे एकदिवसीय ईट राईट मिलेट मेळावा व वॉकेथॉन उपक्रमाचे २९ एप्रिल २०२३ रोजी आयोजन करण्यात येत आहे.प्राधिकरणाच्या इट राइट इंडियाच्या विविध उपक्रम आणि मेळावायांद्वारे भरड धान्यांचा आहारात समावेशास प्रोत्साहन देण्यात येत आहे, सदर उपक्रमात खाद्यपदार्थांच्या स्टॉलसची रेलचेल असेल तसेच वॉकच्या माध्यमातून सुरक्षित व पौष्टिक अन्नविषयक जनजागृती केली जाईल.या मेळाव्याची सुरवात पहाटे ६ वाजता, योगा व झुंबा ने होईल. त्यानंतर वॉकेथॉन तलाव पाली येथे होईल. स्ट्रीट फूड हबचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.तदनंतर संध्याकाळी ४.३० ला भरड धान्य मेळावाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.नंतर विविध स्पर्धा जसे कि, चित्रकला, पोस्टर मेकिंग, रांगोळी प्रश्न मंजुषा, भरडधान्य आधारित पाककृती इत्यादींना सुरवात होईल.सदर कार्यक्रमाचा समारोप सोहळा सायंकाळी ठीक ६ ते ८ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रम विजेत्यांना पारितोषिक वितरण व पाहुण्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईलसुरक्षित आणि निरोगी अन्नपद्धती अंगिकारण्यासाठी सदरहू कार्यक्रमास उपस्थित राहावे व वॉकॅथॉन उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय अन्न संरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारा करण्यात आले आहे.
ML/KA/PGB 25 APR 2023