RBI चा सर्वसामान्यांना दिलासा, कर्जाचे व्याज दर जैसे थे
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाट भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज झालेल्या बैठकीनंतर रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली आहे. तो ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
प्रत्यक्षात देशातील किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये ६.५२ टक्के आणि फेब्रुवारीमध्ये ६.४४ टक्के होता. हा आकडा रिझर्व्ह बँकेच्या महागाई दर २-६ टक्क्यांच्या निश्चित मर्यादेत ठेवण्याच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे, यामुळे रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता होती. मे २०२२ पासून गेल्या वर्षीपर्यंत रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात सलग सात वेळा वाढ केली आहे. त्यामुळे व्याजदर वाढून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आता ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याने पहिल्या तिमाहीत तरी व्याजदर वाढण्याची शक्यता नाही.
EMI वर होतो रेपो दराचा परिणाम
RBI ने ठरवलेल्या रेपो रेटचा थेट बँक कर्जावर परिणाम होतो. रेपो दर हा बँकांना कर्ज देणारा दर आहे. जेव्हा ते कमी होते, तेव्हा कर्ज स्वस्त होते आणि ते वाढल्यानंतर बँका देखील त्यांचे कर्ज महाग करतात. याचा परिणाम होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो आणि कर्जाच्या किमतीमुळे ईएमआयचा बोजाही वाढतो.
SL/KA/SL
6 April 2023