कोकण मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर

 कोकण मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत ४,६४० घरे आणि १४ भूखंडांच्या विक्रीसाठीच्या सोडत अर्ज नोंदणी प्रक्रियेस कालपासून (दि.८) सुरूवात झाली आहे.

१० एप्रिल २०२३पर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर सोडतीत सहभागाची लिंक प्रणालीवरून बंद केली जाईल. तसेच, १२ एप्रिल रात्री ११.५९पर्यंत अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करता येईल. १२ एप्रिल रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस, एनईएफटीमार्फत अनामत रकमेचा भरणा करता येईल. या प्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीतून पात्र ठरविले जातील, असे म्हाडाने म्हटले आहे.

ऑनलाइन संगणकीय असणारी ही सोडत १० मे रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येईल. म्हाडाने नव्याने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीनुसार ही सोडत प्रक्रिया होणार आहे. यानुसार अर्जांच्या नोंदणीवेळीच अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता तपासली जाईल. त्या चाळणीत सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरतील.
SL/KA/SL
9 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *