कॅमेऱ्यासमोर हात जोडून या मराठी कलाकारांनी मागितली माफी, बघा काय आहे प्रकरण
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता प्रसाद ओक याने नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. ज्या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे हात जोडून उभे आहेत, असे दिसत आहे. हा व्हिडीओ ते माफी मागतानाचा आहे. आता ही माफी नक्की कोणाची आणि का मागितली जातेय या बाबत सगळ्यांनाच कुतूहल आहे. जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण.
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कार्यक्रामाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा चाहता वर्गही मोठा आहे. अनेक प्रेक्षक हा कार्यक्रम आवडीनं बघतात. कार्यक्रमातील कलाकार सेटवरील मज्जा, मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रसाद ओकने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे.These Marathi actors folded their hands in front of the camera and asked for forgiveness, see what is the case
प्रसाद ओकने शेअर केलेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये स्वतः प्रसाद ओक, सई ताम्हणकर आणि सोनी मराठीचे सिनियर वाईज प्रेसिडेंट अमित फाळके हे हात जोडून उभे आहेत. या पोस्टमध्ये प्रसादने लिहिले आहे कि , ‘वनिताच्या लग्नाला उपस्थित राहता न आल्यामुळे मी, सई ताम्हणकर आणि अमित फाळके, जाहीर माफी मागत आहोत.’ या व्हिडीओ पोस्टमध्ये वनिता दिसतही आहे आणि प्रसादने पोस्ट टाकतांना विनिताला देखील टॅग केले आहे. प्रसादच्या या अतरंगी पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. पण ह्या व्हिडिओची संपत नाही. प्रसादची ही पोस्ट रिपोस्ट करुन वनिताने, ‘गिफ्ट दिल्याशिवाय माफी नाही मिळणार’, असे लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वी वनिता खरात आणि सुमित लोंढे यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या टीमने हजेरी लावली होती. वनिता आणि सुमितच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वनिताने तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे तसेच हळदीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.
ML/KA/PGB
8 Feb. 2023