पालिकेच्या 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगर पालिकेने विविध प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिका सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात अत्यंत कठोर कारवाई करत असते. 1988 च्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आवश्यक ते सहकार्य महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार, न्यायालयाच्या स्तरावर आरोपपत्र दाखल करण्याचे अधिकार हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे ते नाहीत. खटला दाखल करण्याची फक्त ‘अभियोग पूर्व मंजुरी’ ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 19 (1) अंतर्गत दिली जाते. तसेच लाचलुचपत खात्याकडून केल्या जाणाऱ्या सर्व कार्यवाहीमध्ये आवश्यक ते सर्व सहकार्य बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते असते.Action against 134 employees of the municipality
दरम्यान मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 55 कर्मचाऱ्यांना बडतर्फ (कायमचे कामातून काढून टाकण्यात आले) करण्यात आले आहे. तर 53 कर्मचाऱ्यांचे निलंबन (सेवेतून तात्पुरते कमी) करण्यात आले आहे. पालिकेने अशा 134 कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
ML/KA/PGB
31 Jan. 2023