बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेप

 बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेप

गांधीनगर,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कथित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला गांधीनगर न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

सुरत येथील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामला दोषी ठरवले. यापूर्वी 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूर न्यायालयाने आसारामला उत्तर प्रदेशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

या प्रकरणात आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपी होते. न्यायालयाने आसारामला दोषी ठरवले. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला. उर्वरित पाच आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

2013 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे 10 वर्षांपूर्वी सुरतमधील एका महिलेने आसाराम याच्यावर अहमदाबादच्या आश्रमात वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी अहमदाबादमधील चांदखेडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरनुसार, २००१ ते २००६ दरम्यान अहमदाबाद शहराच्या बाहेरील एका आश्रमात महिलेवर अनेकदा बलात्कार झाला होता. तेव्हा ही महिला आसारामच्या आश्रमात राहात होती.पोलिसांनी जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.

सुरुवातीच्या काळात आसारामने गुजरातच्या खेड्यापाड्यातील गरीब, मागासलेल्या आणि आदिवासींना आपले प्रवचन वभजन-कीर्तनाने आकर्षित केले. त्यानंतर हळूहळू गुजरातच्या शहरी भागातील मध्यमवर्गात त्याचा प्रभाव वाढू लागला.

आसारामचे खरे नाव आशुमल हरपलानी आहे. त्याचा जन्म एप्रिल 1941 मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बेरानी गावात झाला. 1947 च्या फाळणीनंतर हे कुटुंब अहमदाबादमध्ये स्थायिक झाले. 1960 च्या दशकात आसाराम यांनी लीलाशाह यांना आपला गुरू बनवले. आसारामने दावा केला आहे की गुरूंनी आपल्याला आसुमल ऐवजी आसाराम हे नाव दिले आहे. 1972 मध्ये आसारामने अहमदाबादपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोटेरा गावाजवळ साबरमती नदीच्या काठावर आश्रम बांधला.

 

SL/KA/SL

31 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *