पाकीस्तानी दशहतवादी मक्कीचा Global Terrorist List मध्ये समावेश
न्यूयॉर्क, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानमधील दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा (Abdul Rehman Makki) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी (दि. 16) जागतिक दहशतवाद्यांच्या (Global Terrorist) यादीत समावेश केला आहे. संयुक्त राष्ट्राने (United Nations) आपल्या पत्रकामध्ये 16 जानेवारी 2023 रोजी सुरक्षा परिषद समितीने आईएसआयएल, अल-कायदा आणि संबंधित व्यक्तींबद्दलच्या प्रस्तावांवर 1267 (1999), 1989 (2011) आणि 2253 (2015) नुसार दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. UN lists Abdul Rehman Makki as a global terrorist. मक्कीला दहशतवादी घोषित करणं हा भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा विजय मानला जात आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 अल-कायदा प्रतिबंध समितीअंतर्गत मक्कीचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे प्रस्ताव मागील वर्षी जूनमध्ये मांडला होता. या प्रस्तावाला चीनने ऐनवेळी विरोध केला होता.. चीनने यापूर्वी अनेकदा पाकिस्तानामधील दहशतवाद्यांविरोधात मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावांना विरोध केला आहे. मात्र यंदा चीनने पाकिस्तानची साथ सोडल्याने मक्कीला दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळेच हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे
मक्की अत्यंत धोकादायक दहशतवादी असून तो मुख्यतः करुन जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवादी कारवायांसाठी पैसे जमा करणे, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी तरुणांना दहशतवादी म्हणून प्रशिक्षण देणं, हल्ल्यांचं नियोजन करणं, तरुणांच्या डोक्यात टोकाचा द्वेष निर्माण होईल अशा मोहिमा राबवतो.
मक्कीला दहशतवादी घोषित करण्यात आल्याने त्याच्यावर अनेक देशांमध्ये प्रवासबंदी, आर्थिक निर्बंध आणि इतर अनेक निर्बंध लादले जाणार आहेत.
SL/KA/SL
17 Jan. 2023