कोंकण शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात आता आठ उमेदवार

 कोंकण शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात आता आठ उमेदवार

नवी मुंबई, दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज आज मागे घेण्यात आले आहेत.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीत एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. त्यापैकी 1) कडू वेणुनाथ विष्णु, अपक्ष 2) घोन्साल्वीस जिमी मतेस, अपक्ष 3) बळीराम परशुराम म्हात्रे, अपक्ष 4) बाळाराम गणपत पाटील, अपक्ष, 5) ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे, अपक्ष, या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जागे घेतले आहेत.

यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या आता आठ झाली आहे. ते 1) म्हात्रे ज्ञानेश्वर बारकू , भारतीय जनता पार्टी, 2) धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), 3) उस्मान इब्राहिम रोहेकर, अपक्ष, 4) तुषार वसंतराव भालेराव,अपक्ष, 5) देवरुखकर रमेश नामदेव, अपक्ष 6) बाळाराम दत्तात्रेय पाटील, अपक्ष, 7) प्रा.सोनवणे राजेश संभाजी, अपक्ष, 8) संतोष मोतीराम डामसे, अपक्ष असे आहेत.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ML/KA/SL

16 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *