आर्थिक विकास दराने दीर्घकालीन दुहेरी आकडा गाठण्यासाठी भारताची ठोस रणनीती

 आर्थिक विकास दराने दीर्घकालीन दुहेरी आकडा गाठण्यासाठी भारताची ठोस रणनीती

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीच्या विध्वंसातून (devastation of the Corona epidemic) भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian economy) ज्या प्रकारे प्रगती करण्याची क्षमता दाखवली आहे त्यामुळे दीर्घकाळाकरता दुहेरी आकड्याचा विकास दर (long Term double digit Growth rate) (10 टक्क्यांहून अधिक) गाठता येऊ शकेल असा विश्वास धोरणकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. ही रणनीती केवळ मोदी सरकारच्या भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याच्या हेतूचीच पूर्तता करणार नाही तर दोन दशकांत भारताला दारिद्र्यमुक्त करण्यातही हातभार लावेल.
2021-22 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातील तरतुदी आणि देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत दीर्घ काळासाठी दुहेरी आकड्याचा विकास दर (long Term double digit Growth rate) गाठण्याची ठोस रणनीती तयार करण्यावर एकमत झाले आहे. ऑक्टोबर 2020 पासून आतापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये (Indian economy) दिसून आलेल्या अत्यंत लक्षणीय सुधारणा लक्षात घेता सरकारच्या धोरण तयार करणार्‍या अधिकार्‍यांच्या मनात हा विचार डोकावला आहे.
विशेषत: युरोपातील अनेक विकसित देशांमध्ये आणि इतर देशांमध्ये ज्याप्रकारे कोरोना साथीचा नव्याने प्रादुर्भाव झाला आहे ते पहाता भारतासमोर नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये पाश्चिमात्य देशांमधील आर्थिक घडामोडी थंडावल्या आहेत आणि पुढील किमान दोन महिन्यांत त्यात फारशी सुधारणा होईल अशी अपेक्षा नसल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे, कोरोना लसीकरणाच्या कामाने गती घेतल्यानंतर एप्रिल 2021 पासून भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) मजबूत होऊ शकते असे मानले जात आहे. जीएसटी संकलनही सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आहे. शुक्रवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या मासिक अहवालात असे सांगण्यात आले आहे की 2020-21 दरम्यान आर्थिक विकासाची स्थिती पूर्वीच्या अंदाजांपेक्षा चांगली असेल.
निती आयोगाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की आर्थिक विकास दराने दुहेरी आकडा गाठणे हे भारतीय धोरणकर्त्यांचे 1991 मध्ये आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनचे स्वप्न आहे. परंतू अद्याप ते साध्य करता आलेले नाही. पहिल्यांदाच, पुढील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, आर्थिक विकास दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. खरे तर याचे बरेचसे श्रेय 2020-21 मध्ये आर्थिक विकास दरामध्ये झालेल्या मोठ्या घसरणीला जाते. यावर्षी अर्थव्यवस्था आठ टक्क्यांनी घसरण्याची सरकारची अपेक्षा आहे. मात्र सरकारच्या योजना आणि कोरोना कालावधीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता पुढील आर्थिक वर्षात साध्य होणारा दुहेरी आकड्यातील विकास दर पुढेही कायम ठेवला जाऊ शकतो.
कोरोना कालावधीत मोदी सरकारने आर्थिक सुधारणांतर्गत जी पावले टाकली आहेत ती भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) दीर्घकाळासाठी 10 टक्के किंवा त्याहून अधिक जास्तीचा विकास दर कायम ठेवण्यासाठी(long Term double digit Growth rate) सक्षम आहेत. अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यात भारताचा विकास दर पुढील वर्षी 11.5 टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
The way in which the Indian economy has shown resilience in the aftermath of the Corona outbreak has led policymakers to believe that a double-digit growth rate (over 10 per cent) could be achieved in the long run. This strategy will not only serve the Modi government’s goal of making India a 5 trillion economy, but will also help lift India out of poverty in two decades.
PL/KA/PL/8 MAR 2021
 

mmc

Related post