सुक्ष्म कर्ज व्यवसायात दहा टक्क्यांची वाढ

 सुक्ष्म कर्ज व्यवसायात दहा टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मायक्रो फायनान्स (micro finance) म्हणजेच लहान कर्ज देणार्‍या संस्थांनी दिलेली एकूण कर्जे 31 डिसेंबर 2020 च्या स्थितीनुसार वार्षिक आधारावर 10.1 टक्क्यांनी वाढून 2,32,648 कोटी रुपयांवर पोचली आहेत.
या संस्थांचे व्यासपीठ असलेल्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क (एमएफआयएन) च्या मते, या उद्योगातील एकूण कर्ज डिसेंबर 2019 मध्ये 2,11,302 कोटी रुपये होते. सुक्ष्म म्हणजेच छोट्या कर्जांमध्ये (micro finance) 14 बँकांचा सर्वाधिक वाटा आहे. डिसेंबरअखेरीस त्याचे एकूण थकीत कर्ज 97,956 कोटी रुपये होते. त्यापाठोपाठ बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी-एमएफआय) आहेत, ज्यांचे थकित कर्ज 72,128 कोटी आहे. लघु वित्त बँकांचे एकूण थकित कर्ज 39,062 कोटी रुपये आहे.
औद्योगिक संघटनेच्या सूक्ष्म वित्त संदर्भातील 2020-21 च्या तिसर्‍या तिमाहीच्या अहवालानुसार डिसेंबर 2020 ला संपलेल्या तिमाहीत सुक्ष्म वित्त उद्योगाच्या कर्ज वितरणात 3.86 टक्क्यांची घसरण झाली आणि डिसेंबर 2020 अखेरीस ते 59,507 कोटी रुपये होते. एका वर्षापूर्वी याच तिमाहीच्या शेवटी ही रक्कम 61,894 कोटी रुपये होती. प्रत्येक तिमाहीच्या आधारे, डिसेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत सुक्ष्म कर्ज वितरणात 90.4 टक्के वाढ नोंदली गेली आहे. एमएफआयएनशी 58 एनबीएफसी-एमएफआय आणि बँका, लघु वित्त बँका आणि एनबीएफसी यासह 38 वित्तीय संस्था जोडल्या गेल्या आहेत.
As on December 31, 2020, the total loans extended by microfinance institutions increased by 10.1 per cent year-on-year to Rs 2,32,648 crore.
The total debt of the industry in December 2019 was Rs 2,11,302 crore
PL/KA/PL/9 MAR 2021

mmc

Related post