या आहेत 2026 मध्ये सर्वाधिक Dividend देणाऱ्या सरकारी कंपन्या

 या आहेत 2026 मध्ये सर्वाधिक Dividend देणाऱ्या सरकारी कंपन्या

मुंबई, दि. 24 : 2026 या वर्षात तेल आणि गॅस क्षेत्रातील 4 मोठ्या सरकारी कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या चांगला लाभांश मिळवून दिला आहे.

  • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपनीचा २०२६ मध्ये फक्त एकदाच एक्स-डिव्हिडंड व्यवहार झाला आहे. कंपनीचा ऑगस्ट महिन्यात एक्स-डिव्हिडंड व्यवहार झाला होता. कंपनीने यावेळी प्रति शेअर १९.२५ रुपयांचा लाभांश दिला होता.
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने यंदा दोनदा लाभांश दिला. पहिल्यांदा मार्च २०२६ मध्ये कंपनीने प्रति शेअर २ रुपयांचा लाभांश वाटला. तर दुसऱ्यांदा ऑगस्टमध्ये प्रति शेअर १.२५ रुपयांचा लाभांश दिला.
  • भारत पेट्रोलियम या कंपनीच्या शेअरचा व्यवहार वर्षाच्या सुरुवातीला एक्स-डिव्हिडंड म्हणून झाला होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये, कंपनीने प्रति शेअर १० रुपयांचा लाभांश दिला. गेल्या वर्षभरात शेअरची किंमत १६ टक्क्यांनी घसरली आहे.
  • ONGC कंपनीने २०२६ मध्ये तीन वेळा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाचे वाटप केले. पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये. गुंतवणूकदारांना प्रति शेअर ६.२५ रुपयांचा लाभांश मिळाला. कंपनीचे शेअर्स सप्टेंबरमध्ये दुसऱ्यांदा एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड झाले. यावेळी प्रति शेअर 1 रुपयांचा डिव्हिडंड मिळाला. नोव्हेंबरमध्ये ओएनजीसीने प्रति शेअर 8 रुपये लाभांश दिला.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *