अनिकेत पटवर्धन यांच्या पुढाकारामुळे तरूणीच्या डोळ्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी

 अनिकेत पटवर्धन यांच्या पुढाकारामुळे तरूणीच्या डोळ्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी

रत्नागिरी दि २४ : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी आपल्या सामाजिक कार्यातून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे २३ वर्षीय मिताली राऊत हिच्या उजव्या डोळ्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, तिला नव्या आशेचा किरण मिळाला आहे.

मिताली राऊत हिला उजव्या डोळ्याच्या मोतीबिंदूमुळे पाहण्यात मोठी अडचण येत होती. डोळ्यांतून पाणी येणे, जळजळ होणे आणि दृष्टीसंबंधी इतर त्रासांमुळे ती त्रस्त होती. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने मिताली आणि तिचे कुटुंबीय चिंतेत होते. ही बाब लक्षात येताच अनिकेत पटवर्धन यांनी तिच्या उपचारासाठी पुढाकार घेतला.
त्यानुसार सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील इन्फिगो नेत्ररुग्णालयातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. मीना महामुलकर यांनी मितालीच्या उजव्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आधुनिक सूक्ष्म छेद पद्धतीचा वापर करून डोळ्यात अत्याधुनिक ‘टॉरिक ईडीओएफ’ (Toric EDOF) भिंग बसवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर मितालीची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

अवघ्या २४ दिवसांच्या चिमुकल्यासाठी काही तासांत साडेचार लाखांची मदत

काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेत मुंबईतील रुग्णालयात अवघ्या २४ दिवसांचे एक चिमुकले बाळ गंभीर आजाराने त्रस्त होते. गरीब शेतकरी कुटुंबाला उपचारांचा खर्च पेलणे कठीण झाले होते. ही माहिती समीर सप्रे यांच्यामार्फत अनिकेत पटवर्धन यांना समजली. त्यानंतर अनिकेत यांनी रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून समन्वय केला. समीर सप्रे यांचा पाठपुरावा, रवींद्र चव्हाण यांचे आर्थिक सहकार्य आणि अनिकेत पटवर्धन यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या काही तासांत त्या चिमुकल्याच्या उपचारासाठी साडेचार लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली आणि एका गरजू कुटुंबाला मोठा आधार मिळाला.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *