शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारी दर वाढला
नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारी दर (Unemployment rate) वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) (CMIE) आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. त्यांनी सांगितले आहे की 25 जुलैला संपलेल्या आठवड्यात, ग्रामीण भागातील बेरोजगारी दर वाढून 6.75 टक्क्यांवर गेला आहे. त्याच्या एक आठवडा आधी ग्रामीण भागातील बेरोजगारी दर 5.1 टक्के होता.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वाढ कमी
Growth is lower in urban areas as compared to rural areas
सीएमआयई ने (CMIE) सांगितले की या काळात शहरी भागातही बेरोजगारी दरात (Unemployment rate) वाढ झाली आहे. मात्र ग्रामीण भागाच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. 25 जुलैला संपलेल्या आठवड्यात शहरी भागातील बेरोजगारीचा दर 8.01 टक्के होता. एका आठवड्यापूर्वी तो 7.94 टक्के होता.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा रोजगाराच्या संधींवर वाईट परिणाम
The second wave of corona has had a detrimental effect on employment opportunities
सीएमआयईच्या (CMIE) आकडेवारीनुसार, 25 जुलैला संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारी दर (Unemployment rate) 7.14 टक्के होता. एका आठवड्यापूर्वी हा दर 5.98 टक्के होता. जुलैच्या सुरूवातीपासूनच शहरी भागात बेरोजगारी दर 9 टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. या कालावधीत, ही आकडेवारी देशभरात 8 टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे.
कोरोनाच्या (corona) दुसर्या लाटेचा रोजगाराच्या संधींवर वाईट परिणाम झाला आहे. वेगवेगळ्या राज्यात टाळेबंदी (Lockdown) लावण्यात आल्यामुळे आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या. त्याचा परिणाम असंघटित क्षेत्रावर अधिक दिसून आला.
Unemployment rate has increased in urban and rural areas. This is according to data from the Center for Monitoring Indian Economy (CMIE). In the week ended July 25, the unemployment rate in rural areas rose to 6.75 per cent. A week earlier, the unemployment rate in rural areas was 5.1 per cent.
PL/KA/PL/27 JULY 2021