आरोपी मोटेगावकर यांच्या ‘RCC क्लासेस’वर महापालिकेचा बुलडोझर

 आरोपी मोटेगावकर यांच्या ‘RCC क्लासेस’वर महापालिकेचा बुलडोझर

पुणे दि २० : देशभर गाजत असलेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले ‘RCC क्लासेस’चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी डेक्कन परिसरातील RCC क्लासेसच्या शाखेवर बुलडोझर कारवाई करत बांधकामाचा काही भाग पाडला. संबंधित जागेतील काही बांधकाम अनधिकृत व अतिक्रमण असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

महापालिकेच्या पथकाने सकाळपासूनच डेक्कन परिसरात पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली. जेसीबीच्या सहाय्याने प्रवेशद्वारासमोरील आणि व्यावसायिक वापरासाठी करण्यात आलेल्या काही संरचनांवर हातोडा चालविण्यात आला. कारवाईदरम्यान परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर राज्यभरात RCC क्लासेसविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात येत असून काही ठिकाणी RCC च्या फलकांची तोडफोडही करण्यात आली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *