महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केली ए, सी आणि डी भागातील परिसराची पाहणी

 महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केली ए, सी आणि डी भागातील परिसराची पाहणी

मुंबई, दि २०
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी शहर विभागातील ‘ए’, ‘सी’ आणि ‘डी’ विभागात विविध परिसर, चौकी आणि उदंचन केंद्र आदी ठिकाणी आज आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.

यामध्ये, ‘ए’ विभागातील ७४- मिंट मार्गावरील मुंबईतील पहिली आणि सुमारे १०० वर्षे जुनी कीटकनाशक नियंत्रण चौकी, ए-२ रस्ते दुरुस्ती व भांडार चौकी आणि मलनिस्सारण चौकी; ‘सी’ विभागातील कमळाबाई कन्या शाळा मार्गावरील स. का. पाटील उद्यानातील रस्ते दुरुस्ती व भांडार चौकी, विद्यार्थी अभ्यासिका; ‘डी’ विभागातील नाना चौक, कीटकनाशक चौकी तसेच ‘जी दक्षिण’ विभागातील वरळी येथील लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्र यांचा समावेश होता.

श्रीमती भिडे यांनी यावेळी कीटकनाशक नियंत्रणासाठी वापरली जाणारी विविध उपकरणे आणि त्यांचे प्रात्यक्षिक पाहून संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतले. तसेच, मूषक नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, चौकीवरील एकंदरीत कामकाज आदींबाबत सखोल माहिती घेत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंदवही आणि अन्य बाबींची पडताळणी केली.

दरम्यान, कीटकनाशक, स्वच्छता, परिरक्षण आदी विभागातील कर्मचारी, कामगार तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या श्रीमती भिडे यांनी जाणून घेतल्या.

मार्ग (मॅनेजमेंट एंड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हियन्स) एप्लिकेशनवर नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींना अत्यंत गांभीर्याने घेऊन त्यांचे तत्काळ निराकरण करावे. तसेच, स्वतः सक्रियता दाखवून कामकाज करावे, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी यावेळी दिले.

उपायुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (ए विभाग) श्री. गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त (सी विभाग) श्रीमती अलका ससाणे, सहायक आयुक्त (डी विभाग) श्री. संतोष साळुंके, संबंधित अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *