वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले
मुंबई, दि १९
वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला अपुऱ्या सुविधा, रखडलेली दुरुस्तीची कामे तसेच अन्य गैरव्यवस्थेबाबत ग्रासले आसुल्याने येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. त्यामुळे येथील रुग्णांनी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे या रुग्णालयाबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आदित्य ठाकरें यांच्या सूचनेनुसार आमदार सुनील शिंदे यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देत विविध विभागांची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. तसेच उपचारार्थ दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्यां जाणून घेतल्या. यावेळी रुग्णालय प्रशासनासोबत चर्चा करून रुग्णांना दर्जेदार व योग्य आरोग्यसेवा मिळावी, प्रलंबित दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत तसेच आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती आमदार सुनिल शिंदे यांनी दिली.KK/ML/MS