पेपरफुटीच्या आरोपानंतर आता NEET परीक्षा रद्द

 पेपरफुटीच्या आरोपानंतर आता NEET परीक्षा रद्द

मुंबई, दि. १२ : पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२६ रोजी देशभरात पार पडलेली मेडीकल प्रवेशासाठीची NEET-UG 2026 ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतला आहे. पुन्हा होणाऱ्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे NTAकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत देशभरात संतापाची लाट होती. या पार्श्वभूमीवर, ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. NTA’ने उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी केवळ exams.nta.ac.in/NEET या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे

एनटीएचे महासंचालक (डीजी) अभिषेक सिंह म्हणाले, “या चुकीसाठी आम्ही जबाबदार आहोत. परीक्षा पुन्हा घेतली जाईल. नवीन तारीख ६ ते ८ दिवसांत जाहीर केली जाईल.”
दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. या संस्थेने या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. एनटीएने म्हटले आहे की, भारत सरकारची परवानगी मिळाल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दिल्लीत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या प्रकरणी माध्यमांनी प्रश्न विचारले असता, ते काहीही न बोलता निघून गेले.

या परीक्षेसाठी उमेदवारांनी भरलेले संपूर्ण परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. तसेच, फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही नवीन शुल्क भरावे लागणार नाही. परीक्षेचा सर्व खर्च एनटीए आपल्या अंतर्गत संसाधनांतून करणार आहे. ज्या उमेदवारांनी मे २०२६ च्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांची तीच माहिती ग्राह्य धरली जाईल आणि त्यांना नवीन प्रवेशपत्रे जारी केली जातील.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *