TCS महिला अत्याचार प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी

 TCS महिला अत्याचार प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी

नाशिक दि ११ : शहरातील गाजत असलेल्या TCS महिला अत्याचार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी निदा खान हिला अटक करून चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळवली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज तिला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा आदेश दिला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून विविध मुद्द्यांवर चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांचे लक्ष तपासाकडे लागले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *