भीम गर्जना मित्र मंडळातर्फे बुद्ध, शिवराय आणि आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

 भीम गर्जना मित्र मंडळातर्फे बुद्ध, शिवराय आणि आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि ८: भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त भिम गर्जना मित्र मंडळ (रजि.) यांच्या वतीने दोन दिवसीय सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता “महापुरुषांच्या विचारांचे सामाजिक प्रबोधन” या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून “स्वराज्य सूर्य शिवराय, ज्ञानसूर्य भीमराय” या विषयावर प्रा. दामोदर दादा मोरे (साहित्यिक विचारवंत) मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता “सामाजिक प्रबोधन व नृत्याचा अविष्कार” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रथमच कलामंच मुंबईची निर्मिती सादर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रोळीचे आमदार सुनील राऊत उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष अशोक रोकडे, उपाध्यक्ष प्रदीप खरात, अरविंद जाधव, प्रभाकर रामराजे व चिटणीस विनोद खरात तसेच सहसचिव तुषार गायकवाड व निलेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण महात्मा फुले चौक, कन्नमवार नगर-१, विक्रोळी (प.), मुंबई येथे असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांमुळे या महोत्सवाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *