माहिममध्ये ज्येष्ठ गटई कामगाराच्या स्टॉलची विटंबनामाजी आमदार बाबुराव मानेंच्या लढ्यामुळे ४० वर्षे जुना स्टॉल मूळ जागी
मुंबई, दि 8
शीतला देवी मंदिरासमोर, बांबुळी निवास येथे ४० वर्षांपासून गटई काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तानाजी मारुती माने यांचा ‘माने फुट वेअर’ स्टॉल काही समाजकंटक व दुकानदारांनी परवानगीशिवाय उचलून २०० फूट लांब नेऊन ठेवला.
इमारत दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या या प्रकारानंतर “आमच्या दुकानासमोर अनधिकृत स्टॉल” अशी खोटी तक्रार पालिकेकडे करण्यात आली.
मात्र, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष मा.आमदार बाबुरावजी माने यांच्या आदेशाने धारावी तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर, विजय खरात,शंकर बळी व हेमंत बामणे यांनी भर उन्हातून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ठाण मांडले. जी/उत्तर विभागाच्या लायसन्स इन्स्पेक्टर यांना सर्व प्रकार समजावून सांगत अखेर स्टॉल सन्मानाने मूळ जागी परत बसवला.
“गरीबांच्या रोजीरोटीशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही,” असा इशारा राष्ट्रीय चर्मकार संघाने दिला आहे.KK/ML/MS