गुटखा-तंबाखूच्या प्लास्टिक पाऊचवर येणार बंदी

 गुटखा-तंबाखूच्या प्लास्टिक पाऊचवर येणार बंदी

मुंबई, दि. २९ : गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याचे प्लास्टिक पाऊच आता बंद करण्यात येणार आहेत. FSSAI ने सांगितले की, पान मसाल्याच्या पॅकिंगमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक मटेरियल आता कागद, पेपरबोर्ड, सेल्युलोज आणि इतर पर्यावरणपूरक मटेरियलने बदलले जाईल.

यासाठी FSSAI ने मंगळवारी ‘अन्न सुरक्षा आणि मानक (पॅकेजिंग) नियमन 2018’ मध्ये सुधारणा करण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. या मसुदा ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2026’ वर पुढील 30 दिवसांपर्यंत भागधारकांकडून (stakeholders) मते आणि आक्षेप मागवण्यात आले आहेत. त्यानंतर या नियमाला अंतिम स्वरूप दिले जाईल.

नवीन प्रस्तावानुसार, गुटखा, पान मसाला आणि तंबाखूच्या कोणत्याही पॅकेजमध्ये कोणत्याही स्वरूपात प्लास्टिक मटेरियलचा वापर करता येणार नाही. यात ‘विनाइल एसीटेट-मेलिक ऍसिड-विनाइल क्लोराईड कोपोलिमर’ सारख्या रासायनिक मटेरियलवरही बंदी असेल. FSSAI ने सल्ला दिला आहे की, आता प्लास्टिक पाऊचऐवजी कागद, पुठ्ठा (पेपरबोर्ड) आणि सेल्युलोजसारख्या नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जावा.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *