मराठी रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच नाटकाचा ट्रेलर

 मराठी रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच नाटकाचा ट्रेलर

मुंबई, दि. 29 : मराठी रंगभूमीवर नाटकाच्या प्रमोशनसाठी एक हटके प्रयोग पाहायला मिळणार आहे. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक आता आणखी एका भन्नाट गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर आणि अनोख्या प्रोमोमधून या नाटकाची घोषणा झाली होती आणि आता या नाटकाचा ट्रेलर दाखवला जाणार आहे.

1 मे 2026 रोजी ‘जर तर ची गोष्ट’ या लोकप्रिय नाटकाचा 350 वा प्रयोग होणार आहे. या प्रयोगादरम्यान ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ नाटकाचा खास लाईव्ह ट्रेलर सादर केला जाणार आहे.

सोनल प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. नाटकाचे लेखन अमोल पाटील यांनी केले असून दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केलं आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *