नैसर्गिक आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

 नैसर्गिक आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

पुणे, दि. २९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या भागातील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. विद्यापीठाने यासंदर्भातील अधिकृत निर्देश सर्व संलग्न महाविद्यालयांना जारी केले आहेत.

राज्य शासनाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या आधारावर विद्यापीठाने हा पाऊल उचलले आहे. या निर्णयाचा लाभ पुणे, अहिल्यानगर (नगर), नाशिक जिल्हा तसेच दादरा नगर हवेली येथील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना आर्थिक अडचण येऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. ज्या महाविद्यालयांनी अद्याप प्रक्रिया सुरू केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी विद्यापीठाने विशेष लिंक उपलब्ध करून दिली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *