दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ

 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ

मुंबई दि २९ : दिव्यांगाच्या विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षण पाठबळ मिळेल अशारितीने शिष्यवृत्ती मध्ये भरीव वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बारा वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीमध्ये पहिल्यांदाच भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं, या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उच्च माध्यमिक परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना’ या सुधारित योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठ/संस्था/शिक्षण मंडळाला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश फी, ट्युशन फी, नोंदणी फी, खेळ, युनीयन, लायब्ररी, मॅगझिन, वैद्यकीय तपासणी यासारखे इतर द्यावे लागणारे अनिवार्य शुल्काकरिता रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षण शुल्काव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे वित्तीय सहाय्य निश्चित करण्यात आले आहे. अर्थसहाय्य दरमहा या प्रमाणे.

(कंसात पूर्वीचे दर)
गट 1 अंतर्गत पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी, पदव्युत्तर डिप्लोमासाठी निवासी विद्यार्थ्यास १७०० (१२००) तर अनिवासी विद्यार्थ्यास ९०० (५५०) रु.
गट 2 अंतर्गत इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवासी विद्यार्थ्यास १२०० (८२०) तर अनिवासीसाठी ८५० (५३०) रु. गट ३ अंतर्गत वरील दोन्ही गटात समाविष्ट नसलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यास १२०० (८२०) तर अनिवासीसाठी ८५० (५३०) रु. गट ४ अंतर्गत इयत्ता दहावीनंतरच्या पदवीतर डिप्लोमांसाठी निवासी विद्यार्थ्यास ११०० (५७०) तर अनिवासीसाठी ८०० (३००) रु. वित्तीय सहाय्य.

अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता गट १,२ आणि ३ साठी ३०० (१००) रुपये तर गट चार साठी २२५ (७५)रु.
अभ्यास दौरा खर्चासाठी वार्षीक १५०० (५००) रुपये (प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत) तर प्रकल्प (थेसिस) टंकलेखन व छपाई खर्च तसेच पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणासाठी प्रकल्प (थेसिस) टंकलेखन व छपाई खर्च व पुस्तकासाठीचा भत्ता १८०० (६००) रुपये करण्यात आला आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकल्प, टंकलेखन, छपाई व पत्रव्यवहार, पुस्तकासाठी म्हणून आता अठराशे रुपये (प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत) अभ्यास दौऱ्यासाठी पंधराशे रुपये आणि शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संपूर्ण रक्कम मिळणार आहे. याशिवाय अंध विद्यार्थ्यांना आता वाचक भत्ता म्हणून गट १,२, ३ साठी दरमहा तीनशे आणि गट ४ साठी २२५ रुपये दरमहा मिळणार आहेत.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *