विविध यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून पावसाळापूर्व कामे लवकर पूर्ण करावीत आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश

 विविध यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून पावसाळापूर्व कामे लवकर पूर्ण करावीत आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबई, दि २८

बृहन्मुंबई क्षेत्रात कार्यरत विविध प्राधिकरणे आणि यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.
पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर विविध प्राधिकरणाची संयुक्त बैठक आज (दिनांक २८ एप्रिल २०२६) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर, पोलिस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक श्री. कैलास मीना यावेळी उपस्थित होते.

तसेच, महानगरपालिकेचे परिमंडळीय उपायुक्त, प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी, विविध प्राधिकरणे आणि यंत्रणांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *