स्वयंपाक केल्यास स्मृतिभ्रंशाचा धोका होतो कमी
मुंबई, दि. २७ : स्वयंपाक करणे मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकते. एका नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की, आठवड्यातून एकदा जरी स्वयंपाक केला तरी डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) चा धोका कमी होतो. हा अभ्यास नुकताच बीएमजेच्या जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे.
टोक्यो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 11 हजार लोकांचा 6 वर्षांपर्यंत अभ्यास केला. त्यांनी पाहिले की हे लोक घरी स्वतःसाठी किती वेळा स्वयंपाक करतात. निष्कर्ष सांगतात की, जे लोक जास्त वेळा स्वयंपाक करत होते, त्यांच्यामध्ये डिमेंशियाचा धोका कमी होता.
संशोधकांना असे आढळले की, स्वयंपाक करण्यामध्ये किराणा खरेदी करण्यापासून ते पाककृती आणि योग्य घटक व प्रमाणाची निवड करण्यासारखी अनेक गुंतागुंतीची कामे समाविष्ट असतात.
SL/ML/SL