या कंपनीकडून एकाच वेळी 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात
मुंबई, दि. २७ : टेक कंपनीने Oracle ने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात जाहीर केली आहे. कंपनीने जगभरातील जवळपास 20 ते 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. सकाळी ई-मेल्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यामध्ये अमेरिका, भारत, कॅनडा आणि लॅटीन अमेरिका येथील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कंपनीच्या ‘AI’ विस्ताराच्या मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
टेक कंपन्या सध्या Artificial Intelligence म्हणजे मध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. ते कामाचा प्रवाह स्वयंचलित करत आहेत. टीमची नव्याने बांधणी केली जात आहे. अधिक कार्यक्षमता, कमी उत्पादन खर्च, जास्त नफा हा यामागे उद्धेश आहे. जेव्हा ऑटोमेशन वाढतं, तेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या अनेकदा कमी होते. गुंतवणूकदार सहसा यालाच पसंती देतात. कर्मचारी कपातीच्या घोषणांनंतर अनेकदा शेअरच्या किमतीत वाढ होते.
गेल्या एका महिन्यातच Meta, Microsoft, Disney आणि ASML यांसारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
रिपोर्टनुसार, अलीकडील काही आठवड्यांत Meta आणि Microsoft या दोन्ही कंपन्यांमध्ये मिळून 20 हजारांहून अधिक नोकऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. हा कल तंत्रज्ञान, मनोरंजन आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये दिसून येत आहे. हा प्रकार केवळ तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांपुरता मर्यादित नाही; तर नफ्यात असलेल्या कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत.
SL/ML/SL