परळ येथील के.ई.एम. रूग्णालयाचे नामांतर न करण्याबाबत झाले आंदोलन
मुंबई, दि २७
परळ येथील के.ई.एम. रूग्णालय म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल रूग्णालय हे अनेक गोरगरीब रूग्णांचे आधारस्थान आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून अनेक रूग्ण के.ई.एम. रूग्णालयात उपचाराकरीता येत असतात. दि. २२ जानेवारी २०२६ रोजी के.ई.एम. रूग्णालयाला १०० वर्ष पुर्ण झाली आहेत.
या रूग्णालयाला ऐतिहासिक महत्व असून जागतिक दर्जाचे डॉक्टर या रूग्णालयातून शिकून मोठे झाले आहेत. जगभरात के. ई. एम. रूग्णालय, परळ अशीच या रूग्णालयाची ओळख आहे. अशा या रूग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रूग्णालय’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे. याचा शिवसेना उभाठाच्या वतीने आज आंदोलन करून तीव्र निषेध केला. मंगलप्रभात लोढांना आम्ही सांगतो की आपण मुंबईत जे टोलेजंग टॉवर बांधत आहात त्यातील एका टॉवरमध्ये एखादे धर्मादाय रूग्णालय बांधावे व त्याचे नाव आपण सुचविल्याप्रमाणे द्यावे. लोढांच्या या प्रस्तावास स्थानिक आमदार म्हणून माझा व जनतेचा तीव्र विरोध असून असा कोणताही प्रयत्न आम्ही परळवासिय सहन करणार नाही. याची आपण तीव्र गंभीर दखल घेऊन आरोग्य समिती मधील प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी मागणी स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी के एम हॉस्पिटलच्या प्रशासनाला पत्र देऊन तसेच निषेध करून व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS