पुण्यात मद्यधुंद तरुणाकडून PMPML ची बस चोरण्याचा प्रयत्न
पुणे, दि. २५ : पुण्यात आज एका मद्यधुंद तरुणाने चक्क PMPMLची बस पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तो मद्यधुंद अवस्थेत बस घेऊन जात होता. संबंधित प्रकार हा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने बस चोरून नेण्याचा डाव रचला होता. त्यातून त्याने बसचा ताबा घेतला आणि अत्यंत बेशिस्तपणे चुकीच्या दिशेने पीएमपी बस चालवत होता. डेक्कनच्या गुडलक चौकात या चालकाने ताब्यात असलेली बस बेधडकपणे डिव्हायडरवर चढवत तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा त्याच दिशेने बस पळवली. पण त्याला रस्त्यात थांबून पोलिसांनी त्याच्या ताब्यातली बस काढून घेतली.
पोलिसांनी प्रसंगावधान साधत बसचा पाठलाग केला आणि ती बस थांबवली. यावेळी आरोपी तरुण हा बाहेर येण्यास तयार नव्हता. त्यामुळे पोलिसांचे पथक हे बसमध्ये शिरले. त्यांनी मद्यधुंद चालकाला बसमधून खाली उतरवलं. यासाठी पोलिसांना ताकद लावावी लागली. . पोलीस आता मद्यधुंद तरुणाची चौकशी करत आहेत. हा तरुण कोण आहे, कुठला आहे, त्याचा हेतू काय होता? याची संपूर्ण चौकशी आता पोलिसांकडून केली जात आहे.
SL/ML/SL
SL/ML/SL