मुंबईत ४० जणांना हवे आहे इच्छा मरण

 मुंबईत ४० जणांना हवे आहे इच्छा मरण

मुंबई, दि. २७ : भारतामध्ये इच्छा-मरण (Passive Euthanasia) संदर्भातील नुकतीच गाजलेली केस म्हणजे गाझियाबाद येथील हरिश राणाचा इच्छामृत्यू. ११ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच जीवनरक्षक उपचार मागे घेण्यास परवानगी दिली आणि हा भारतातील पहिला कायदेशीररित्या अंमलात आणलेला Passive Euthanasia ठरला. हरिश राणा यांचा मृत्यू २४ मार्च २०२६ रोजी AIIMS दिल्ली येथे झाला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय देशाच्या न्यायव्यवस्थेत अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक ठरला. या निर्णयानंतर देशभरातून अनेक प्रतिक्रियाही उमटल्या असतानाच या संदर्भात मुंबईतून एक मोठी बातमी पुढे आली आहे. त्यानुसार एकट्या मुंबईत ४० जणांना इच्छामृत्यू हवा असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेने विविध प्रभागांतील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे इच्छामरणासंदर्भात अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी दिली आहे. पालिकेकडे आत्तापर्यंत ४० जणांनी इच्छामरणासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, यासंदर्भात कोणतीही सुस्पष्टता नसल्याने या अर्जांचे पुढे काय? असा पेच निर्माण झाला आहे. अशा अर्जांची डिजिटल नोंद करण्यासाठी सरकारच्या शहरी विकास विभागाने पोर्टल तयार केलेय आहे. मात्र, अद्याप महापालिका स्तरावर त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे पुढे आले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *