हॅरी पॉटर वेब सिरीजचा टीझर रिलीज

 हॅरी पॉटर वेब सिरीजचा टीझर रिलीज

लंडन : वॉर्नर ब्रदर्सच्या आठ ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर हॅरी पॉटर पुन्हा एकदा चाहत्यांसमोर येत आहे, मात्र यावेळी एका नवीन वेब सीरिजच्या रूपात. एचबीओने लंडनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात या सीरिजचा पहिला अधिकृत टीझर प्रदर्शित केला आहे. ही वेब सीरिज जे.के. रोलिंग यांच्या पहिल्या पुस्तक ‘हॅरी पॉटर अँड द फिलॉसफर्स स्टोन’ वर आधारित असेल. निर्मात्यांनी जाहीर केले आहे की ही सीरिज २०२६ च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित केली जाईल. यावेळी हॅरी पॉटरची भूमिका डॉमिनिक मॅकलाफलिन साकारणार आहेत.

ही सिरिज OTT प्लॅटफॉर्म HBO ची लाईव्ह-अ‍ॅक्शन सिरीज आहे. भारतीय चाहते ती HBO ॲपवर पाहू शकतील. याशिवाय, ही सिरीज जिओ हॉटस्टारवर देखील प्रदर्शित होऊ शकते. चित्रपटांनंतर वेब सीरिजच्या माध्यमातून हॅरी पॉटरची कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चाहत्यांमध्ये या घोषणेमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, जादूई जग पुन्हा एकदा नव्या रूपात अनुभवायला मिळणार आहे.

एचबीओच्या या उपक्रमामुळे हॅरी पॉटर मालिकेला नवा आयाम मिळणार असून, जागतिक स्तरावर चाहत्यांना ख्रिसमसच्या निमित्ताने एक खास भेट मिळणार आहे. टीझरमध्ये हॅग्रिड आणि हॅरीच्या भेटीसोबतच प्लॅटफॉर्म 9¾, हर्मायनी ग्रेंजर आणि रॉन वीजलीसोबत हॅरीच्या पहिल्या भेटीची झलक दाखवण्यात आली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *