श्रीराम दरबार मध्ये श्रीराम नवमी उत्साहात साजरी
पुणे, दि २६- जय श्रीराम चा जयघोष, श्रीराम जय राम जय जय राम मंत्राचा अखंड मंत्रोच्चार, विविध रामभक्तीपर गीतांचा जागर आणि हजारो राम भक्तांची उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात कोंढवा खुर्द येथील श्री संकट हरण महादेव मंदिराच्या आवारातील श्रीराम दरबार मध्ये श्रीराम नवमी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
पवन बंसल आणि सुनीता बंसल यांनी आपला नातू मास्टर सरस बंसल याच्या स्मृतीनिमित्त कोंढवा खुर्द मधील श्री संकट हरण महादेव मंदिरामध्ये 2021 रोजी श्रीराम दरबार या मंदिराची स्थापना केली.या मंदिरामध्ये श्रीराम सेवा समितीच्या माध्यमातून यंदा सहाव्या वर्षी श्रीराम नवमी उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. पवन बंसल, सुनीता बंसल, ईश्वरचंद गोयल, जयभगवान गोयल, पवन चमेडिया, गुंजन तवाल ,नरेंद्र गोयल ,प्रेमचंद मित्तल ,सतीश अग्रवाल ,योगेश जैन, गोयल गंगा ग्रुपच्या गीता गोयल, विक्रम बंसल रुची नरेंद्र गोयल, माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांच्यासह हजारो राम भक्त या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते.
दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म उत्सवाचा सोहळा थाटामाटात पार पडला.श्रीराम नवमी उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर विविधरंगी फुलांनी सजविण्यात आलेले होते. विविध रंगी सजावट आणि आकर्षक रोषणाई यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता.मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेले भजन, आरती आणि धार्मिक कार्यक्रमामुळे मंदिर परिसरामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
महोत्सवा संदर्भात पवन बंसल म्हणाले , दरवर्षी रामनवमी या मंदिरामध्ये अतिशय उत्साहात साजरी करण्यात येते.याच्या माध्यमातून श्रीरामांचा आशीर्वाद सर्व जनतेला मिळत आहे याचा आम्हाला आनंद आहे.
सुनिता बंसल म्हणाल्या, आमचा नातू सरस बंसल याच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या माध्यमातून आम्हाला श्रीराम भक्तांची सेवा करण्याची दरवर्षी संधी मिळत आहे ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे.
तानाजी लोणकर म्हणाले 1868 रोजी श्री संकट हरण महादेव मंदिर स्थापन करण्यात आले त्यानंतर या मंदिरामध्ये विविध देवतांची मंदिरे निर्माण करण्यात आली पवन कुमार बंसल यांच्या माध्यमातून 1921 रोजी श्रीराम दरबार हे प्रभू रामाचे मंदिर स्थापन करण्यात आले यामध्ये दरवर्षी श्रीराम नवमी उत्सव उत्साह साजरा करण्यात येतो आणि सुमारे 50 हजार भाविक यामध्ये सहभागी होतात.
गीता गोयल म्हणाल्या, आम्हाला श्रीराम दरबार या मंदिराच्या मुळे श्रीराम नवमीच नव्हे तर इतर वेळी ही श्रीराम भक्तांची सेवा करण्याची संधी मिळत आहे त्यामुळे हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे.KK/ML/MS