राज्यात आता सीटीएस आणि सर्वे क्रमांकानुुसार स्वतंत्र रेडिरेकनर दर

 राज्यात आता सीटीएस आणि सर्वे क्रमांकानुुसार स्वतंत्र रेडिरेकनर दर

मुंबई दि १८ : आता यापुढे राज्यात प्रत्येक सीटीएस नकाशाला तसेच सर्वे क्रमांकासाठी स्वतंत्र रेडीरेकनरचा दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. हा निर्णय आधी मुंबईसाठी लागू होईल आणि मग पुढील तीन वर्षात संपूर्ण राज्यासाठी लागू केला जाईल, हा निर्णय पुढील वर्षापासून लागू होईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

मुद्रांक शुल्क कमी भरणा भरणाऱ्या दस्तऐवजांना मुदतीत नोटीस देऊन मुद्रांक शुल्क वसुलीची वेळ मर्यादा संपुष्टात येणार नाही अशी तरतूद करणारे विधेयक विधानसभेत आज मंजूर करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वी मुद्रांक शुल्क थकवणाऱ्या लोकांना वेळेत नोटीस न दिल्यामुळे त्यातील काही जण न्यायालयात गेले आणि त्यांनी देय असलेली मुद्रांक शुल्क रक्कम रद्द करून घेतले . यामुळे आता ते वसूल करण्याच्या कालमर्यादेत किमान नोटीस देणे आवश्यक आहे. अशी नोटीस दिल्यानंतर वेळ मर्यादेचे बंधन राहणार नाही असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडताना केला.

कायद्यामध्ये असा बदल केल्यामुळे १९१६ असे दावे आहेत त्यातून ७०० कोटी मुद्रांक शुल्क राज्याला मिळू शकेल असंही मंत्री यावेळी म्हणाले. राज्यामध्ये वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करणे तसेच महसूल संदर्भातील असे अनेक अधिकार आता शासनाकडे न ठेवता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत त्यासाठी लवकरच कायदा आणला जाईल अशी माहिती देखील बावनकुळे यांनी यावेळी दिली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *