नागरीक मरनयातना भोगत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष… खा संजय दिना पाटील
मुंबई, दि. ११ – मुंबई उपनगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असून ईशान्य मुंबई परिसर डंम्पिग ग्राऊंड झाला आहे. प्रदुषणाच्या विळख्यामुळे हे शहर आता राहणे योग्य राहिले नाही. शहरातील डम्पिंग ग्राऊंड मधील वैद्यकीय कच-यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने स्थानिक नागरीकांचे आयुमान कमी झाली आहे. स्थानिकांना विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांनी ग्रासले असून त्यावर उपचार करण्यासाठी पुर्व उपनगरात एकही सुसज्ज असे रुग्णालय नाही. जे रुग्णालय आहे तेथे डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरीक मरत यातना भोगत आहेत. मात्र सत्ताधा-यांना त्याचे काहीच सोयरसुतक राहिले नसून अधिकारी कोणाचे ऐकेनासे झाले आहे. प्रशासकीय अधिका-यांचा मुजोरपणा वाढत चालला असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले. वांद्रे येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा.संजय दिना पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरीत नागरीकांच्या मुलभुत प्रश्नांवर प्रशासनाला कोंडीत पकडले.
शासनाच्या बेजबाबदार पणामुळे सर्व सामान्य नागरीकांचे कामे होत नसून एक लोकप्रतिनिधी म्हणुन ते आम्हाला विचारतात. मुंबई शहरात प्रदुषणाने उच्चांक गाठला असून विविध प्रकारचे संसर्गजन्य आजारांनी या शहराला ग्रासले आहे. त्यामुळे हे शहर आता राहणे योग्य राहिले नसून त्याची स्थिती खालावत चालली आहे. तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याची टीका ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली. खासदार पाटील यांनी जोरदार मुद्दे मांडत बैठकीत उपस्थित असलेल्या सत्ताधारी नेत्यांची तोंडे बंद केली. ईशान्य मुंबईत सर्व सुविधांनी सुसज्ज असे एकही रुग्णालय नाही आहे. राजावाडी रुग्णालयात रुग्णाबरोबर गेलेला व्यक्ती ही आजारी पडेल अशी अवस्था राजावाडी रुग्णालयाची झाली आहे. स्विपरचे काम करणारा रुग्णांच्या जखमांवर टाके मारतो तर शताब्दी रुग्णालयात वार्ड बॉय महिला रुग्णांचे ईसीजी काढतो. सर्व काही राम भरोसे असून वैद्यकीय सुविधा शुन्य झाली आहे. घाईघाईत उद्घाटन केलेल्या मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी उपलब्ध नाहीत. भांडुपला झालेल्या बेस्ट बसच्या अपघातातील जखमींना अगरवाल रुग्णालयात नेले असता, येथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने बाहेरून डॉक्टर आणि औषध आणुन जखमींवर उपचार करावे लागल्याची माहिती खा. संजय दिना पाटील यांनी बैठकीत सांगितली. शिवाजी नगर, गोवंडी येते असलेल्या एसएमएस कंपनीला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. या कंपनीमुळे या भागात प्रदुषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ या कंपनीचे स्थलांतर करावे. मुंबईतील सर्व कचरा ईशान्य मुंबईत येत असल्याने या भागातील प्रदुषणात वाढ झाली आहे. विषारी वायुंमुळे विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार स्थानिक लोकांना झाले असून त्यांची आयु कमी झाली आहे. उपचार करण्यासाठी जवळपास त्यांना शासकीय रुग्णालय देखील नसल्याने राजावाडी किंवा सायन येथे जावे लागते. मुंबईतील प्रवेशव्दार असलेल्या मुंलुंड ते शिवाजी नगर, गोवंडी या सर्व भागात वाहतुक कोंडीचा विषय गंभीर होत चालला असून वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुक पोलिसांनी योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. त्याच बरोबर गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यामुळे वाहतुक कोंडी होत असून त्यांना इतर ठिकाणी जागा देण्यात यावी, भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ फेरीवाले तसेच वाहतुक कोंडीची मोठी समस्या होत असते. या ठिकाणी बेस्ट बसला पार्किंग मिळत नाही. मनपा अधिकारी, वाहतुक पोलीस यांनी या जागेची पाहणी केली असली तरी येथील पार्किंग व फेरीवाल्यांचा प्रश्न अद्यापही सोडविता आलेला नाही. भांडुप येथील जुन्या झालेल्या बेस्ट बसेस बदली करण्यात याव्यात. पालिकेच्या कामांना एनओसी मिळत नसून ती वेळेवर देण्यात यावी. पीएपी प्रकल्पा अंतर्गत नागरीकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यात यावे. त्यांना गोवंडी, देवनार या ठिकाणी पाठवू नका. भांडुप, मुलुंड मध्ये पायाभुत सुविधांचा अभाव असून धारावीकरांचे पुनर्वसन या ठिकाणी केले तर सर्व व्यवस्था कोलमडून जाईल. मुलुंड ते शिवाजी नगर, गोवंडी भागात खुलेआम अमली पर्दार्थांची विक्री केली जाते. मात्र त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. गोवंडीत तर ड्रग्स माफियांनी सर्व परिसरात खासगी सीसीटीव्ही लावले असून सर्व प्रकारच्या गतीविधींवर एका कंट्रोल रुममधून नजर ठेवली जात असल्याचा गौप्यस्फोट खा. संजय दिना पाटील यांनी केला. त्यावर पालकमंत्री आशिष शेलार यांनी आश्चर्य व्यक्त केले.
भांडुपला झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, त्याच प्रमाणे त्यांना वैद्यकीय खर्च मिळालेला नसून तो देण्यात यावा. अशी मागणी खा. संजय दिना पाटील यांनी शेवटी केली.ML/ML/MS